ग्रंथराज दासबोधातील नवविधा भक्तीनामक चतुर्थ दशकात समर्थ रामदासांनी विविध भक्तीमार्गांचे वर्णन केले आहे, महती सांगितलेली आहे. पण यातील तिसर्या समासातील जो मार्ग सांगितला आहे तो म्हणजे नामस्मरणाचा मार्ग. हा भक्तीमार्ग सर्व मार्गांपेक्षा वेगळा, सोपा आणि शीघ्र फलदायी असा आहे.


