‘प्रश्न ज्येष्ठ नागरिकांचे’ हा लेख लिहिला आणि अनेकांना तो विषय भावला. सकाळपासून फोन यायला लागले. त्यापैकी एक प्रतिक्रिया फार बोलकी होती. ती म्हणजे घरात एकाकी पडल्यामुळे मी घर सोडून जाण्याचा विचार करत होतो, पण हा लेख वाचल्याने मला जगण्याची नवी उमेद आली आहे. आनंदाने जगण्याचा विचार केला आहे. हेच इथे अपेक्षित होते. शेवटी हा विषय खूप व्यापक आहे. प्रत्येकाला म्हातारं व्हायचं आहे असे म्हणून चडफडत राहण्यात अर्थ नाही, तर हे कशामुळे घडते त्याची दुसरी बाजूही बघायला पाहिजे.
हा प्रश्न गेल्या ५० वर्षांत जास्त वाढला आहे. याला कारण या काळात आलेली नाटके, सिनेमे, मालिका यांचा मनावर मोठा परिणाम झालेला आहे. नकारात्मक झालेला आहे. पूर्वी सगळे एका कुटुंबात होतेच की. भांडतं असावं पण नांदतं असावं, या भावनेने जगत होते सगळे. घरातील मोठा माणूस तोच कर्ता करविता म्हणून त्याच्या आज्ञेने, इच्छेने चालत असे. घरातील आजोबांची परवानगी ही अंतिम होती. मग हे नंतर का बदललं?
साधारणपणे १९७० ते ८० च्या दशकात अनेक चित्रपट या विषयावर निर्माण झाले. अनेक नाटके आली. त्याचा मूळ उद्देश बाजूला राहिला आणि नकारात्मक परिणाम झाला. यातील काहींवर आज टिपण्णी इथे करणार आहे. वि. वा. शिरवाडकर यांचे नटसम्राट हे नाटक, जयवंत दळवी यांचे संध्या छाया आणि वसंत कानेटकरांचे प्रेमाच्या गावा जावे या नाटकांचा उल्लेख करावा लागेल. त्याचप्रमाणे अवतार हा राजेश खन्ना, शबाना आझमीचा चित्रपट याने फार परिणाम केला. त्याचा मूळ उद्देश बाजूला पडला.
नटससम्राट नाटकात एका नटसम्राट अभिनेत्याची शोकांतिका आहे. ज्याने आयुष्यभर शेक्सपिअरची नाटके केली, त्याच्या शोकांतिका केल्या, तो त्या ट्रान्समधून कधी बाहेरच आला नाही. आपल्याही आयुष्याची शोकांतिकाच होणार असे समजणारा तो नायक आहे. रंगभूमीवर काम करणारा कलाकार आपल्या भूमिकेतून बाहेर पडत नसतो. तो त्यातच जगत असतो. भूमिका जगत असतो. लांब कशाला छत्रपतींची भूमिका करणारे डॉ. अमोल कोल्हे यांचे भाषण आपण ऐकले तर ते ऐतिहासिक भाषा बोलत आहेत हे जाणवते, कारण ते अजूनही त्या ट्रान्समध्ये आहेत. कलाकाराचे असेच असते. हे रंगभूमीवरच्या कलाकाराचे सत्य लक्षात न घेता सामान्य प्रेक्षकांनी म्हातारपण वाईट असतं, समोरचं ताट द्यावं, पण बसायचा पाट देऊ नये एवढंच लक्षात घेतलं. ते कौटुंबिक समस्याप्रधान नाटक नाही, तर शोकांतिकांचा सम्राट असलेल्या नटसम्राटाची ती शोकांतिका आहे, पण चुकीचा संदेश गेला. मग ते नाटक प्रेक्षकांना समजले नाही. अवघड होते की, कलाकार कमी पडले. यावर वेगळी चर्चा होईल, पण म्हातारपणी मुलं विचारत नाहीत असा अनावश्यक संदेश यातून गेला. त्याचा समाजमनावर परिणाम झाला आणि जनरेशन गॅप वाढत गेली. साधारपणे विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात येण्याचा हाच काळ आहे. मुलाचे घर स्वतंत्र झाले, वेगळी चूल सुनेने मांडली की ते घर आपल्याला परकं झालं असा समज झाला. जिथे आपपरभाव आला तिथे दु:ख आले.
संध्या छायामध्ये जयवंत दळवींनी कातरवेळ घेतली आहे. मुलं परदेशात असलेल्या एकाकी नाना-नानींची असुरक्षितता. संध्याकाळची वेळ ही नेहमीच सर्वांना असुरक्षित भीती निर्माण करणारी वाटते. सूर्य मावळतो आहे, आयुष्यात अंधार येणार का? पण चंद्र उगवणार आहे. चांदण्याही आनंद देतील, तो आनंद आम्ही नाही शोधू शकलो. त्यामुळे नाना-नानी हे विक्षिप्त होतात. विचित्र वागतात. त्यामुळे माणसांना प्रश्न पडतो की, खरंच म्हातारपण हे इतके वाईट असते का? पण म्हातारपण वाईट नसते. आपण आनंदात जगायचे असते. हे खºया अथार्ने सांगितले ते वसंत कानेटकरांनी.
कानेटकरांनी प्रेमाच्या गावा जावे या नाटकातून दोन पिढ्यांमधील नाही तर तीन पिढ्यांमधील अंतर अधोरेखित केले. यात म्हातारपणीही कसे आनंदात जगता येते हे शिकवले. अगदी आजोबांनी नातवाबरोबर सिगारेट ओढण्यापर्यंत आणि नातवंडांशी मैत्री करत सल्लागार बनण्याचे कसब त्यांनी दाखवले आहे. नातवंडांना जेव्हा आजी-आजोबा हवेहवेसे वाटतात तेव्हा मुलं कधीच तुमचा तिरस्कार करू शकत नाहीत. दुधावरची साय असते ती. ती दुधापासून वेगळी नाही होत ना. प्रेमाने सगळं छान जगता येते. परस्परांना समजून घेणे महत्त्वाचे असते, पण त्यातला मतितार्थ समजला तर सगळं आहे. कानेटकर या नाटकात म्हणतात ते फार महत्त्वाचं आहे. म्हातारपणी खूप काही शिकायचं असतं. ते शिकवता येत नाही, पण शिकता मात्र जरूर येते. चिडचीड करण्यासाठी म्हातारपण नसते. म्हातारपणी तोंड उघडायचे ते शाबासकी देण्यासाठी आणि मूठ उघडायची ती बक्षीस देण्यासाठी. अरे जीवन किती सुंदर होईल पहा. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मी कधी म्हातारा होणार.
पण अवतारसारखे, बागबानसारखे चित्रपट आले आणि सुपरस्टार असलेल्या राजेश खन्ना, अमिताभ यांनाही म्हातारपणी वाईट जीवन जगावे लागते याचा मानसिक धक्का समाजाला बसतो. सासू-सुनेच्या मालिका येतात. त्यात कुठेतरी तिरस्काराची भावना दाखवली जाते. त्यातून आपल्या कुटुंबातील सदस्याशी सुना-नातवंडांशी मुला-मुलींची तुलना केली जाते आणि मनात अढी निर्माण केली जाते. हे टाळले तर म्हातारपण हे पण सुंदर आहे हे लक्षात येईल.
आयुष्यभर आपण काटकसर करत जगला, घरचे पोळीभाजी, पिठलं, भात खाल्ले. पैसाही नव्हता आणि ते खर्च करायचे धाडस नव्हते. आता मुलाबाळांबरोबर हौस करायला काय हरकत आहे? थोडं आधुनिक बनूया. सर्वांचे कौतुक करून आपले कोडकौतुक करून घेऊ या, असा विचार केला तर खूप आनंद भेटेल. नटसम्राट व्हायला जाऊ नका, संध्या छाया पाहू नका, तर प्रेमाच्या गावाला जा. बागबान होऊ न नवा अवतार घडण्यामुळे एकटे होण्याचे नशिबात येईल. त्यापेक्षा आपल्या जीवनात आनंदाचं झाड लावा. काय पहायचे आणि काय घ्यायचे हे नेमके कळले तर खूप आनंद मिळेल यात शंकाच नाही.



VIPjllogin, so you wanna play VIP? Probably means better bonuses and stuff. Login is probably quick, then get ready to spin! Find the VIP login at vipjllogin.
8qbets… The name is short and catchy! A nice selection of different betting options. Have fun with 8qbets
Alright, for the Brazilian crowd, bet81apostas seems alright. They offer options for different bets. Could have better local offers but could be the next big site! Check it at bet81apostas
QCman88… hmm, I think I saw this recommended in a forum. Is it worth it? Give it a quick look: qcman88
Yo, first look at fcb8, the homepage grabbed my attention. Digging it. Worth checking out. fcb8