आपल्याकडे यज्ञ, होमहवन याला फार महत्त्व आहे. यज्ञात आहुती देणे, अग्नीला प्रसन्न करणे हे कर्मकांडात, यज्ञ संस्कृतीत महत्त्वाचे मानले जाते, पण ते नेमके काय आहे याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आपण जेवायला बसतानाही श्लोक म्हणतो. त्यात जठराग्नीला शांत करण्यासाठी उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म, असे म्हणून पोटातल्या अग्नीची पूजा करतो. ते नेमके काय आहे हे समजणे आवश्यक आहे.
जगातील निरनिराळ्या खंडांमध्ये ज्या प्राथमिक संस्कृती गेल्या दीडशे वर्षांत आढळल्या, त्यांच्यातील बºयाच अग्निपूजक आहेत. अग्नी हा राक्षस व पिशाच यांचा निवारक व पापनाशक आहे, अशी त्यांची परंपरागत समजूत आहे. प्राचीन ग्रीक व रोमन लोकांतही अग्नीस पवित्र व पापनिवारक शक्ती म्हणून सांभाळण्याची परंपरा होती. हिब्रूंच्या धर्मग्रंथात अग्नीचा महिमा वर्णिलेला नसला, तरी ते देवाची पूजा व प्रार्थना करताना देवाला अर्पण करावयाचे पदार्थ वेदीवरील अग्नीत टाकीत असत. म्हणजे देवांपर्यंत आहुतीच्या माध्यमातून घास पोहोचवण्याचे माध्यम हे अग्नी आहे. अग्नी हे ऊर्जेचे प्रतिक आहे, म्हणून या ऊर्जेचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.
पंचभूतत्वांपैकी तिसरे भूतत्व व त्याची अधिष्ठात्री देवता केवल अग्नी विशेषण. विशिष्ट अग्नी व अन्य देवतांसहित अग्नी ही चारही वेदांत मिळून २,४९१ मंत्रांची देवता आहे. अतिथी, कवितम, दूत, पुरोहित, हव्यवाट अशा शेकडो गुणबोधक विशेषणे वेदमंत्रांत आहेत. काही मंत्रांचा अग्नी हा ऋषी आहे. हा सर्व देवांचे मुख तसेच त्यांचा दूत आहे. वेदमंत्रांत व स्मृतींत वृषभ व मनुष्य यांच्या संमिश्र रूपाने याचे वर्णन केले आहे, ते असे की, चार शिंगे, तीन पाय, दोन मस्तके, सात जिव्हा, सात हात, चार नेत्र, चार कान, दोन नासिका, दोन पुच्छे, तीन ठिकाणी बांधलेला उजव्या चार हातांत शक्ती, अन्न, स्त्रुक्त व स्त्रुव; डाव्या तीन हातांत तोमर, व्यजन व घृतपात्र; वाहन मेंढा, वर्ण पिंगट, गोत्र शांडिल्य असे आहे.
अग्नी हा धर्म व वसू (स्त्री) यांचा पुत्र. अष्टवसूंपैकी एक. भार्या वसोधार्रा, कृत्तिका, स्वाहा इत्यादी. पुत्र द्रविणक, स्कंद इत्यादी. स्वाहेचे पुत्र पावक, पवमान, शुची व त्यांचे ४५ पुत्र हे सर्व अग्निरूप, म्हणून मूळ अग्नीसह एकूण अग्नी ४९; बृहस्पतीपासून सहा अग्नी व परत त्यांच्यापासून अपरिमित अग्नी उत्पन्न झाले. या सर्वांत एकच अग्नितत्व आहे.
अग्नीची व अग्निजिव्हांची निरनिराळी नावे आहेत. विविध कर्मांत विशिष्ट नावांनी अग्नीची स्थापना व विशिष्ट जिव्हेत दिलेली आहुती धर्मशास्त्रात विहित आहे. त्रैवर्णिकांना अग्न्युपासना नित्य आहे. अग्निपूजक जागतिक मोठे धर्म म्हणजे प्राचीन हिंदू धर्म व इराणी लोकांचा म्हणजे पारशांचा झरथुष्ट्री (जरथुश्त्री) धर्म होत.
वेदांमध्ये म्हटले आहे की, अग्नी हा मानवांचा मित्र व पालक असून, तो अमर व त्रिभुवनसंचारी आहे; तो इंद्र, वरुण, सूर्य इ. देव व माणसे यांच्यातील मध्यस्थ म्हणजे देवदूत आहे. अग्नी देवतांना यज्ञात बोलावून आणतो किंवा देवतांकडे हवी पोहचवितो, अशी वेदांची कल्पना आहे. भारतीय आर्याच्या विवाह, उपनयन, अंत्येष्टी इ. संस्कारांत अग्निपूजेलाच प्राधान्य असते. अग्नीची पूजा म्हणजे मंत्रपूर्वक अग्निस्थापना, प्रार्थना, समिधा, दूध, तूप, यव, तांदूळ, मांस वा अन्य अन्नात्मक द्रव्यांचे अग्नीला वा अन्य देवतांना उद्देशून हवन करणे व अखेरीस अग्निदेवाचे विसर्जन करणे. वैदिक धर्मात गृहस्थाचे म्हणजे आर्याचे अग्निहोत्र हे नित्य कर्तव्य मानले आहे. पारशी धर्मात अग्नी हा पवित्र व अमर स्वर्गीय प्रकाश मानला आहे. त्याच्या नित्यपूजेकरिता पारशी लोक अग्निमंदिरे (अग्यारी) बांधतात. तो अग्नी विझू नये म्हणून वैदिक आर्यांप्रमाणे त्याच्या रक्षणाची काळजी घेतात.
अर्थात अग्नी हे शक्ती आणि ऊर्जेचे साधन आहे. त्यामुळे तो कायम पूजनीय आहे तसाच त्याच्यापासून सावधानताही बाळगणे आवश्यक आहे.
अग्नी हा जसा पूजेसाठी आहे, तसाच तो शस्त्राचे प्रतिक आहे. कोणत्याही अस्त्र आणि शस्त्राचा परिणाम अग्नीकांड हाच आहे. त्या ऊर्जेतून निर्माण होणारी आग ही विध्वंसक असते. अणूऊर्जा, अण्वस्त्रे असोत वा क्षेपणास्त्रे, तोफेचे गोळे असोत वा बंदुकीची गोळी सगळीकडे अग्नीच आहे. एखादी ठिणगीही या अग्नीची फार मोठी ताकद असते. पूजा करणे याचा अर्थ शांत आणि प्रसन्न करणे. अग्नीला शांत आणि प्रसन्न करून घेणे याचा अर्थ सौम्य उब त्याने द्यावी, त्यातून प्रेम निर्माण व्हावे आणि त्याच्यातून होणारी विध्वंसक शक्ती दमन करून ठेवावी. हाच अग्नीपूजेचा अर्थ आहे.
हाहाकार माजवणे, राखरांगोळी करणे यासाठी अग्नीचा वापर नाही. वाईट प्रवृत्तींचे दहन करण्यासाठी अग्नी आहे. वाईट प्रवृत्तींचे दहन केल्यावर त्याचे तोंड गोड करण्यासाठी हवन देणे हे कार्य आहे. आगीच्या ऊर्जेवर दगडी कोळशाच्या माध्यमातून रेल्वे इंजिन कसे धावते हे आपण पाहिले आहे. त्यामुळे अग्नीच्या शक्तीचा योग्य वापर कसा करायचा हे लक्षात घेतले पाहिजे.
– प्रफुल्ल फडके/संस्कृती
9152448055\



Alright you lot, spotted baji999casino. Thinking about trying my luck. Might be a bit of alright. What do you reckon? Have at it baji999casino.
What’s up everyone? I stumbled upon 777win97 the other day. It’s got a good vibe, the support team was helpful when I had a question. Not groundbreaking, but a fun place to spend some time.
Seems like yolo247inida is specifically for Indian players. Good to see platforms catering to specific regions. Haven’t used it myself, but heard good things from friends in India.
Yo, just checked out du88bet, looks pretty slick! Gotta admit, the games are fire and the site’s easy to navigate. Might just become my new go-to. Check it out yourself! du88bet
Mgamebet07… never heard of ’em! But hey, gotta stay open-minded, right? Could be a hidden gem. I’ll have a peek, report back if I find anything worthwhile. mgamebet07