डॉक्टर घनशाम चंदवाणी आपल्या केबिनमध्ये बसले होते. त्यांनी तातडीने सर्व सिनिअर डॉक्टर स्टाफची मिटींग बोलावली होती. या मिटींगला अकाऊंट्स, मॅनेजमेंट या सर्व विभागांचे एचओडींना पण आमंत्रित केले होते. शिपायाने सगळे जण कॉन्फरन्स हॉलमध्ये जमल्याचे सांगितल्यावर डॉक्टर चंदवाणी कॉन्फरन्स हॉलमध्ये गेले. सर्वांनी उठून त्यांना मान दिला.
‘सीटडाऊन प्लीज..’ म्हणत डॉक्टर चंदवाणी आपल्या चेअरवर बसले. सगळ्यांकडे मंद स्मितहास्य करत एक नजर टाकली आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. डॉक्टर चंदवाणी जेव्हा स्मितहास्य करून कोणाकडे बघतात, तेव्हा त्यांच्या डोक्यात काही तरी शिजतंय हे सर्वांना माहिती होते. ‘गुडमॉर्निंग गाईज…’, असं म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. ‘हॅलो डॉक्टर गिडवाणीजी, पेशंट पोझीशन काय आहे?’, ‘सर, सगळे वॉर्ड फुल आहेत. आयसीयूचा वॉर्डही फुल आहे. या साथीमुळे बेडची कमतरता भासण्याची शक्यता आहे. थोडे बेड वाढवावे लागतील, असे वाटते.’ गिडवाणींनी एका दमात माहिती दिली. तसे चंदवाणी म्हणाले, ‘गुड… तुमचे सगळे सहकारी डॉक्टर व्यस्त आहेत ना? कोणी रिकामे बसत नाही ना?’, ‘नाही सर, सगळ्यांवर कामाचा ताण आहे. नर्सचा स्टाफ थोडा वाढवता आला, तर…’ त्यांना लगेच थांबवत चंदवाणी म्हणाले, ‘गरज नाही त्याची… नंतर विचार करू… ओव्हरहेड्स वाढवायचे नाहीत आपल्याला. आहे त्यात चालवून घ्या. बाय द वे, मिस्टर पाटील.. तुम्हीच अकाऊंट्सचे हेड आहात ना?’
‘ होय सर’ राजाराम पाटील यांनी मान डोलावली. तसे चंदवाणींनी विचारले, ‘बिलींग वसुली, औषधांचा स्टॉक याचा काय ताळमेळ आहे? पेशंट्सकडून वेळेत पैसे येत आहेत ना? धर्मादाय काही नाही ना? आपण उपचार करून त्यांचे प्राण वाचवत आहोत. त्याचा मोबदला मागताना बिचकून चालणार नाही. शेवटी जीवन देण्याचा आपण धंदाच करत आहोत. घोडा घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या? शोले पाहिलाय ना? वसुलीकडे लक्ष द्या.’
पाटील गडबडले. म्हणाले, ‘सर, आयसीयू वॉर्डमधील दहा-बारा पेशंट असे आहेत की, त्यांचे पैसे वेळेत येत नाहीत. बहुतेकांचे बिल दोन ते अडीच लाखांच्या घरात झाले आहे. त्यांचे पैसे वसूल करणे आव्हान आहे. त्यांना डिस्चार्ज देणेही अवघड झाले आहे. दुसरीकडे हलवा सांगितले तरी ऐकत नाहीत.’
डॉक्टर चंदवाणी छदमी हसले, डोळे किलकिले करून म्हणाले, ‘हं… आपल्या हॉस्पिटलचे फायर आॅडीट झाले आहे का?’, ‘हो सर… मागच्याच महिन्यात भंडाºयाची घटना घडल्यानंतर आपण करून घेतले आहे.’
‘हॉस्पिटलचा फायर इन्शुरन्स, थेप्ट इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स अप टू डेट आहे का?’ चंदवाणींनी चौकशी केल्यावर पाटील यांनी हो म्हणून सांगितले. चंदवाणींनी पुन्हा विचारले, ‘जे बिलं देण्याची टाळाटाळ करत आहेत, ज्यांची बिलं थकली आहेत, अशा पेशंटपैकी किती जणांचे मेडिक्लेम आहेत? त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली का?’
‘हो सर, आपण अॅडमिट करतानाच मेडिक्लेम आहे का, कॅशलेस आहे का, अशी चौकशी अर्जात भरून घेत असतो; पण यात सात ते आठ जणांकडे कसलीच पॉलिसी नाही. त्यामुळे त्यांना बिलच पेड करावे लागणार आहे; पण कोणा मोठ्या लोकांचा, स्थानिक नगरसेवक, नेते यांची ओळख सांगून पैसे बुडणार नाहीत, अशी हमी दिली जाते.’ पाटील यांनी घडाघडा सांगितले. तसे शांतपणे डॉक्टर चंदवाणी म्हणाले, ‘नगरसेवकांवर विश्वास ठेवू नका. त्यांना चार लोकांत मोठेपणा हवा असतो, म्हणून ते पत्र देतील, मोठेपणा घेतील. एकतरी नगरसेवक किंवा नेता याचे बिल मी भरतो म्हणतो का? आयजीच्या जिवावर बायजी उदार… असं नको.’
सगळे गप्प बसले. एकूणच तंग वातावरणात आता काय निर्णय होतो, डॉक्टर चंदवाणी काय बोलतात हे ऐकायला सगळ्यांनी श्वास रोखला. तसे एकदम हसत डॉक्टर चंदवाणी म्हणाले, ‘चहा घेतला ना सगळ्यांनी? मग आता उत्साहाने कामाला लागा. रात्रीचा स्टाफ थोडा कमी करा, दिवसा सगळ्यांची दगदग होते, थोडी विश्रांती प्रत्येक डॉक्टरला मिळाली पाहिजे. डॉक्टर फीट तर सगळ्यांना बरे करता येणार आहे. त्यामुळे रात्री राऊंड मारण्यापुरते एक-दोन डॉक्टर असतील, तर सगळ्यांनी थांबायची गरज नाही. वॉर्डबॉय, नर्स असतातच. इमर्जन्सी असेल, तर पटकन बोलावून घेता येईल. तसे रात्रीच्या ड्युटीचे नियोजन करा. ओके मिस्टर, देशपांडेजी, आपले वकील कुठे आहेत?’
‘सर, अॅडव्होकेट खानविलकर आज येणारच आहेत. खरं तर त्यांनाही मिटींगला बोलावले होते; पण क्लाएंट असल्यामुळे थोडा उशीर होईल म्हणाले.’
‘इट्स ओके… ते आले की, त्यांना माझ्या केबिनमध्ये अर्जंट पाठवा. ओके. इट्स आॅलराईट’, असं म्हणून डॉक्टर चंदवाणी उठले आणि केबिनमध्ये आले. सगळे जण आपापल्या कामाला लागले.
‘गुडमॉर्निंग डॉक्टर…’ अॅडव्होकेट खानविलकर केबिनमध्ये येत म्हणाले तसे गंभीरपणे डॉक्टर चंदवाणी म्हणाले, ‘गुड आफटरनून वकील साहेब.’
‘सॉरी… सर, जरा क्लाएंटबरोबर मिटींग लांबल्यामुळे उशीर झाला. सकाळची दुपार झाली.’ खानविलकर हसत म्हणाले तसे चंदवाणी म्हणाले, ‘आता तू पडलास माझा लहानपणापासूनचा दोस्त; पण त्यामुळे चिडताही येत नाही. असो. आता मुद्याचच बोलतो.’ चंदवाणी बोलू लागले तसे अॅड. खानविलकर गंभीरपणे ऐकत होते. चंदवाणी म्हणाले, ‘सध्याच्या परिस्थितीत मी एक नवीन ट्रिटमेंट सुरू करायच्या विचारात आहे. त्यादृष्टीने तू सगळी फिल्डींग लाव आणि कायदेशीर बाबी पूर्ण करायला लाग. आज हॉस्पिटलचा वाढता खर्च पाहता रुग्णांचे बिल वेळेत येणे आवश्यक आहे; पण तसे होत नाही. वीस पेशंट आयसीयूत दाखल आहेत. प्रत्येकाचे रोजचे बिल दहा-दहा हजाराने वाढत चालले आहे. सरासरी प्रत्येकाचे दोन ते तीन लाख बिल बाकी आहे; पण ही वसुली होत नाही. यातील बहुतेक पेशंट हे जगणारे नाहीत. नातेवाईकांच्या आग्रहाखातर त्यांना आयसीयूत ठेवले आहे. असेही ते मरणारच आहेत, म्हणून मी फायर ट्रिटमेंट देण्याचा विचार करत आहे.’
‘व्हाट डू यू मीन?’ खानविलकरांनी विचारले तसे डॉक्टर म्हणाले, ‘येस आय मीन….येत्या दोन दिवसांत रात्री हॉस्पिटलला आग लागेल, यात हे पेशंट दगावतील. हॉस्पिटलचे नुकसान झाले, तरी इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला भरपाई मिळेल. रुग्णांच्या नातेवाईकांना सरकारकडून, महापालिकेकडून आर्थिक मदत जाहीर होईल. दहा लाख सरकारी मदत मिळाली, तर बिल सेटलमेंट करायला त्यांचे नातवाईक तीन लाख देतील आणि त्यांना सात लाख फुकट मिळतील. त्यादृष्टीने आगीनंतर सगळी कागदपत्रे, कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी असेल. माझ्यासमोर दुसरा पर्याय दिसत नसल्याने ही फायर ट्रिटमेंट मला योग्य वाटते.’ डॉक्टर चंदवाणींनी सांगितले, तसे अॅड. खानविलकर ताडकन उठले आणि म्हणाले, ‘ठिक आहे, लागतोच तयारीला.’
दोनच दिवसांनी सकाळी सकाळी ब्रेकींग न्यूज आली. मुंबईतील नामांकीत जीवनज्योत रुग्णालयाला शॉर्टसर्किटने आग लागली. आगीत बारा जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली.



777phslot, slots are fun, and the graphics are pretty good. I’ve had a few wins, so I can’t complain. Spin those reels at 777phslot.
Dabetlive, eh? Gave them a go the other day. Not a bad experience, to be honest. The live dealers were friendly and the interface is easy to use. Worth checking out if you’re looking for some live action. Get started here: dabetlive
58jili, mukhang bago ‘to ah! I’m always on the hunt for new games. Fingers crossed that this one’s good. Trying my luck: 58jili
Anyone tried 69win10? I’m always on the lookout for new places to throw down a few bucks. Tell me if you have an experience with this site: 69win10
Looking for the VIP treatment? qqbr4vip is where it’s at. Top-notch service and seriously good promos. Get your VIP on with qqbr4vip