बुधवारी नाशिकमध्ये उबाठा शिवसेनेचा मेळावा झाला. त्यात एआय तंत्रज्ञानाच्या वापराने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपातून, त्यांच्यासम आवाजातून विचार मांडण्याचा प्रयत्न झाला. पण एकंदरीतच हा मेळावा उबाठा शिवसेना वाढवण्यासाठी नाही तर भाजप तिरस्काराचा निर्धार करण्यासाठी होता हे दिसून आले. पण, तिरस्कारातून काही साध्य होत नाही तर विकासात्मक कार्यक्रम आपल्या हाती असेल, तरच मतदार जवळ करतात हे लक्षात घेण्याची गरज आहे. तिरस्काराच्या राजकारणातून राहुल गांधी काँग्रेसची वाताहात लावत असताना उबाठा शिवसेनाही त्याच दिशेने चालली आहे याचे वाईट वाटते.
या एआय तंत्रज्ञानाच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषणातून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचेच विचार दिसत होते. कारण बाळासाहेबांचे भाषण महाराष्ट्राने ऐकलेले आहे. ते कधी असे टोमणे मारणारे भाषण करत नव्हते, तर परखडपणे स्पष्टपणे कोणाचाही मुलाहिजा न बाळगता बोलत होते. पण गेल्या दहा वर्षांत जी नवी पिढी राजकारण पाहते आहे आणि ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे ऐकली नाहीत, त्यांना बुधवारच्या एआय कृत भाषणावरून प्रश्न पडला असेल की, एवढे महान व्यक्तिमत्त्वही असेच भाषण करत होते का? हा खºया अर्थाने बाळासाहेबांना लहान करण्याचा, त्यांचे अवमूल्यन करण्याचा प्रकार होता. त्यामुळे या मेळाव्यात एआयच्या माध्यमातून बाळासाहेबांचा अपमानच केला असे म्हणावे लागेल.
रोज सकाळी कॅमेºयापुढे येऊन संजय राऊत जे बोलतात तेच एआयच्या भाषणात मुद्दे आले होते. त्यातला एक मुद्दा म्हणजे आम्ही भाजपला मोठे केले. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सातत्याने बोलत आहेत की, भाजपला फडणवीसांना मिसरूडही फुटले नव्हते, तेव्हापासून शिवसेना आहे आणि आम्ही भाजपला मोठे केले. पण संजय राऊत आणि शिवसेना उबाठाला संपूर्ण महाराष्ट्राचा एक प्रश्न आहे की, जर तुम्ही भाजपला मोठे केले, तेवढी तुमची ताकद होती तर तुम्ही का मोठे झाला नाहीत? तुम्ही का संपत चालला आहात? राजकारणात कोणी कोणाला मोठा करत नसतो, प्रत्येकाला स्वत:ला मोठे व्हायचे असते. शिवसेना अजून संपूर्ण महाराष्ट्रातही पोहोचलेली नाही, पण भाजप राष्ट्रीय पातळीवरचा मोठा पक्ष आहे. अनेक राज्यांत त्यांची सत्ता आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडीशा तसेच इशान्येकडील राज्यात सगळीकडे तो पसरला आहे. अगदी कोणत्याही पक्षाला पाय रोवता येत नाहीत अशा प. बंगालमध्येही तो मोठा पक्ष आहे, तिथे तर शिवसेना कुठेच नाही. शिवसेनेने मोठे केला असते तर अन्य राज्यात कोणी मोठे केले? त्यांनी आपली कामगिरी शिस्तबद्दपणे केली, संघटन कौशल्य दाखवले, कोणाला टोमणे मारत बसले नाहीत, एकमेकांना भेटत राहिले आणि पक्ष मोठा झाला. त्यामुळे भाजपला आम्ही मोठे केले असे म्हणणे सोडावे आणि आपण मोठे होऊ का कसे होता येईल हे पाहावे.
विशेष म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातही इतकी विसंगती होती की, त्यांना मुद्दे पुरवणाºया, फिडिंग करणाºयांची कीव करावीशी वाटते. काँग्रेसचे प्रवक्ते असल्याप्रमाणे ते आपल्या भाषणात बोलत होते. त्यात काँग्रेस आणि संघाची तुलना केली. आता काँग्रेस आणि भाजपची तुलना करायची की संघाची? म्हणजे एकीकडे राहुल गांधी भाषणात बोलतात संघाला आपल्याला हरवावे लागेल. म्हणजे जणू काही संघ निवडणुकीच्या मैदानात आहे. तीच स्क्रिफ्ट उद्धव ठाकरे वाजवतात? संघाला अध्यक्ष, सरसंघचालक कोण असावा याची चर्चा करण्यापेक्षा त्यांनी विचार केला पाहिजे की, शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षाला आपण दुसरा शिवसेनाप्रमुख देऊ शकलो नाही. त्या पदाला आपण पात्र नाही, असे सांगून ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष देसाई, मनोहर जोशी आणि वरिष्ठांनी शिवसेनाप्रमुख होऊ दिले नाही. त्यांच्यासाठी दुसरे पद निर्माण केले आणि शिवसेनाप्रमुखपद गोठवले. तिथेच शिवसेना संपली होती हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे या निर्धार मेळाव्यात उबाठा शिवसेना वाढवण्याऐवजी तसा निर्धार करण्याऐवजी भाजप तिरस्काराचा निर्धार केला गेला हे लक्षात घेतले पाहिजे. मोदी, शाह, फडणवीस आणि भाजपवर टीका करून त्यांची जाहिरात होईल. ते तुम्हाला उत्तरही देणार नाहीत तर ते विकासकामे करत राहतील आणि तुम्ही मात्र तिरस्कार करत बसाल आणि जनतेच्या मनातून आणखी उतराल हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
अनेक मुद्दे आहेत नाशिकच्या मेळाव्याबाबत पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एआयच्या माध्यमातून केलेले बाळासाहेबांचे अवमूल्यन हे कोणाही सच्चा शिवसैनिक आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाºया मराठी मनाला आवडलेले नाही. बाळासाहेबांच्या तोंडून तुमची भाषा वदवायची वेळ आली याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे की, तुमचे कोणी ऐकायला तयार नाही. पण यात एका थोर व्यक्तीचे आपण अवमूल्यन करत आहोत, हे विसरून गेलात. आणखी एक गोष्ट म्हणजे, माझ्या नशिबाने मला इतके महान आई, वडील लाभले असे म्हणून उद्धव ठाकरे यांनी तमाम उपस्थितांच्या आई, वडिलांचा अपमान केला. प्रत्येकाला आपले आई, वडील प्रिय असतात. तुमचे वडील इतक्या मोठ्या पदाला पोहोचले होते की, ते संपूर्ण राज्याचे झाले होते, त्यांना माझे वडील चोरले म्हणून सीमित करण्याचा प्रकार अनाकलनीय आहे.
संजय राऊत सातत्याने १०५ हुतात्मे या महाराष्ट्रासाठी दिले असे सांगतात. पण ते काही शिवसैनिक नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यावेळी शिवसेनेचा जन्मही झालेला नव्हता. ते सर्व गिरणी कामगार होते. पण गेल्या ३५ वर्षांत त्याच गिरणी कामगारांची अवस्था काय झालेली आहे? २५८ गिरण्या मुंबईत होत्या. त्या का बंद पडू दिल्या? गिरणी कामगारांच्या बलिदानाचे श्रेय घेता मग गिरण्या बंद पडल्या त्याचीही जबाबदारी घेणार का? आज महाराष्ट्र हा सवाल तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही.
प्रफुल्ल फडके/अन्वय
९१५२४४८०५५



Yo, I just signed up with 11qbet. The bonuses are pretty fire. Gotta check it out! Try it out: 11qbet
Hey, 399pakgame! Just checked it out. Looks pretty solid for some casual gaming fun. Might just have to give it a whirl later. Always looking for new stuff to play, you know? Check it out guys! 399pakgame
Okay, so VIP666VIP777VIP888, eh? Sounds fancy! Anyone know if this is actually VIP treatment or just another site? Curious! Check them out yourself: vip666vip777vip888
Alright lads, heard about m8888e and decided to give it a go. Pretty similar to other sites, but what I like is the bonus they offered when I joined. Check it out if you’re looking for some decent promos!
Just tried out zz777br1, and gotta say, it’s pretty slick! The layout is clean, and I found some games I really dig. Definitely worth checking out, guys! Give it a go at zz777br1.