काम करता करता सिगारेट ब्रेक घेणाºया कर्मचाºयांची संख्या जगभरात खूप मोठी आहे. साधारणपणे चहा, कॉफी किंवा सिगारेट यांच्यासाठी ब्रेक घेणे ही बाब इतकी मोठी मानली जात नाही, पण आता पुढे वारंवार सिगारेट ब्रेकसाठी गेलात, तर खिशाला कात्री लागू शकते. स्पेनमध्ये काही वर्षांपूर्वी ही फार मोठी गोष्ट घडली आहे. त्याचे सर्वत्र अनुकरण होणे गरजेचे आहे. सिगारेटप्रमाणेच मोबाइलवर फालतू आणि घरगुती गप्पा मारणे यावरही बंदी घालण्यात आली पाहिजे. कार्यालयीन कामात काम ठेवून मोबाइलवर बोलायला बाहेर पडायचा आऊटस्टँडिंग परफॉर्मन्सही बंद झाला पाहिजे.
स्पेनच्या एका कंपनीने याबाबत एक याचिका कोर्टात दाखल केली होती. सिगारेट ब्रेक घेणाºया कर्मचाºयांची पगारकपात करण्याबाबत स्पेनच्या एका कोर्टाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे सिगारेट ब्रेक घेणाºया कर्मचाºयांची पगारकपात करण्याचा अधिकार या कंपनीला प्राप्त झाला आहे. याचे अनुकरण संपूर्ण जगभर करण्याची गरज आहे, किंबहुना भारतात तरी ते होणे आवश्यक आहे. कारण आपल्याकडे काम करण्यापेक्षा टाइमपास करण्याचे प्रमाण जास्त असते. सिगारेट, तंबाखू सेवनाच्या निमित्ताने कामातील दिरंगाईचे प्रमाण वाढत जाते. एक सिगारेट दहा मिनिटे जळत असेल, तर त्यासाठी बाहेर येणे-जाणे यात किमान अर्धा तास वाया जातो. तीच गत तंबाखूची असते. तंबाखू मळायची, तोंडात टाकायची आणि सतरादा बाहेर थुंकायला जायचे. यामध्ये कामात दुर्लक्ष होत असते.
भारतात तंबाखू खाऊन काम करणाºयांची संख्या फार मोठी आहे, किंबहुना तंबाखूमुळे अंतरही कमी होते, म्हणजे साहेब आणि शिपाई एका चिमटीत खातात. शिपाई आपल्या हाताने मळून देतो आणि कर्मचारी, शिक्षक खाताना दिसतात. या सगळ्या गलिच्छ प्रकाराला आळा बसला पाहिजे. इतकेच नव्हे, तर कामाव्यतिरिक्त फोनवर घरगुती विषयावर तासन्तास बोलून पॅसेजमध्ये अनेक कर्मचारी फिरत असतात. घरी बोलायला वेळ नाही, म्हणून आॅफिसच्या कामाच्या वेळेत बोलत राहतात. त्यामुळे दफ्तर दिरंगाई वाढत असते. अशा कर्मचाºयांचाही पगार कापला पाहिजे. खरेतर तंबाखू आणि सिगारेटवर कार्यालयीन वेळेत बंदीच असली पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा कर्मचारी दारू पिऊन आला, तर तो गुन्हा आहे, तसाच हा गुन्हा ठरवला गेला पाहिजे. कारण त्याचा इतरांना त्रास होत असतो. त्यामुळेच स्पेनच्या कंपनीचे अनुकरण सर्वत्र झाले पाहिजे. ही कंपनी आता या निकालाची अंमलबजावणी करत असून, कामाव्यतिरिक्त वेळ घालवणाºया कर्मचाºयांचा पगारकापत असल्याचे ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणाºया गल्प या कंपनीने म्हटले आहे.
एखादा झटपट घेतलेला कॉफी ब्रेक असो किंवा सहकाºयासोबत नाश्ता करण्यासाठी लागलेला वेळ, गल्पच्या धोरणांनुसार आता याचा पगार कापण्यात येत आहे. २०१९च्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही नियमावली लागू करण्यात आली होती. कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचा विरोध करत कंपनीला कोर्टात खेचले होते. पण स्पॅनिश कायद्यांनुसार कंपनीसाठीच्या नियमावलीत बदल करण्यात आला आहे. कर्मचाºयांच्या येण्या-जाण्याच्या वेळेची नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले. त्याचा परिणाम गेल्या पाच वर्षांत या कंपनीची कामगिरी सुधारली आहे. हे आपल्याला करावे लागेल.
ही देखरेख कर्मचाºयांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी, तसेच कामातील लवचिकता वाढवण्यासाठी करण्यात आली होती. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीनुसार, स्पेनमध्ये २०१९ मध्ये तीस लाख तास ओव्हरटाइम करण्यात आला, पण याचा मोबदला कर्मचाºयांना मिळाला नाही. कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्यामुळे, तसेच त्यांना विनामोबदला ओव्हरटाइम करावा लागत असल्यामुळे त्यावर उपाय म्हणून हा नियम लागू करण्यात आला. हे भारतातही झाले पाहिजे. कामाच्या वेळेत टाइमपास करायचा आणि नंतर ओव्हरटाइमचे बिल पाठवायचे हा प्रकार म्हणजे कंपनीला बुडवण्याचा प्रकार आहे. आज या निर्णयाचा स्पेनमधील सुमारे १० लाख धूम्रपानकर्त्या कर्मचाºयांवर परिणाम झाला आहे, पण यातून काही तरी चांगले निर्माण होईल, अशी अपेक्षा करण्यात आली आणि त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. त्यामुळे जे स्पेनमध्ये घडले, ते भारतात झाले, तर फार मोठी प्रगती होईल. सिगारेट, तंबाखू आणि चहाच्या नावाखाली कर्मचारी किती टाइमपास करतात. त्यामुळे फार मोठी दफ्तर दिरंगाई होत असते. त्यामुळे जनतेचे सार्वजनिक ठिकाणचे नुकसान होत असते. त्यामुळे अशी पगारकपातीची कारवाई या देशातही होणे आवश्यक आहे.
आज परिस्थिती अशी आहे की, आओ-जाओ घर तुम्हारा. त्यामुळे कर्मचारी कार्यालयात कधी येतात, कधी जातात या सगळ्यांची नोंद ठेवण्यात येऊ लागली. त्याद्वारे ते किती वेळ काम करतात याची आकडेवारी कंपन्या ठेवू लागल्या. बायोमॅट्रिक थम्ब इम्प्रेशनच्या नोंदीमुळे बºयापैकी आळा बसला आहे. उशिरा कामावर येऊन आधीच्या वेळेची नोंद करायचे प्रकार आता करता येत नाहीत, पण सिगारेट, तंबाखूच्या निमित्ताने टाइमपास करणारी प्रवृत्ती मात्र मोठी असते. याला आळा बसण्यासाठी भारतातही असा कायदा झालाच पाहिजे. आपल्याकडे काही वर्षांपूर्वी भाजप सरकारने कोणत्या कामासाठी किती वेळ असला पाहिजे. नागरिकांची कामे किती दिवसांत पूर्ण झाली पाहिजेत, याबाबत एक कायदा केला होता, पण आज त्याचा परिणाम शून्य आहे. कारण त्याची अंमलबजावणी झाली नाही. प्रशासनाने तो कायदा बासनात गुंडाळून ठेवला.
पण गल्प या कंपनीत आपल्या कामाच्या वेळेत जेवण करणाºया किंवा सिगारेट ब्रेकसाठी बाहेर जाणाºया कर्मचाºयांना पूर्ण दिवसाचा पगार देण्यात आला नाही. या कालावधीतले त्यांचे पैसे कापण्यात आले. त्याचा धक्का जगभर बसला, पण त्याचे अनुकरण होणे गरजेचे आहे. आता स्पेनच्या हाय कोर्टानेही सिगारेट, कॉफी किंवा नाश्त्यासाठी ब्रेक घेणाºया कर्मचाºयांना त्या वेळेचे पैसे देण्यात येऊ नयेत, असा आदेश दिला आहे. त्यामुळे सिगारेट ब्रेक घेणाºया कर्मचाºयांची पगारकपात होऊ लागली. युरोपियन राष्ट्रे ही शिस्तीने मोठी झालेली आहेत. आपल्यालाही शिस्त बाळगून भारत मोठा करता येईल. महासत्तेचे स्वप्न पाहण्यापूर्वी कर्मचारी वेळेत कामाला येतात की नाही, ते वेळेवर काम करतात की नाही, हे पाहिले पाहिजे. रोजच्या दिवसाचे काम रोज वेळेत करतात की नाही, यावर लक्ष दिले पाहिजे.
प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीनुसार युरोपीय देशांमध्ये स्पेनचे कर्मचारी सर्वात जास्त काम करतात. पोतुर्गाल किंवा इटली यांच्याप्रमाणे स्पॅनिश लोक आपला जास्तीत जास्त वेळ कार्यालयाच्या ठिकाणी घालवतात, पण तरीही त्यांच्यावर हा कारवाईचा बडगा उगारण्याची वेळ आलेली आहे. आपल्याकडे भारतात मुळातच कामावर उशिरा येण्याची आणि काम कमी करण्याची प्रवृत्ती आहे. त्यातही सीएल, पीएल, मेडिकल लिव्ह अशा विनाकारण रजा घेण्याची प्रवृत्तीही असते. कर्तव्याची जाणीव नाही, पण हक्काची जाणीव आपल्याकडे असते. रजेचा आमचा हक्क आहे, पण कामाचा नाही, अशी प्रवृत्ती आहे. त्यामुळे भारतातही शिस्तीचा कायदा झाला पाहिजे.
प्रफुल्ल फडके/अन्वय



Alright PokerBaazi fans! Needed to download the app and this made it super easy. Straight to the point, no dodgy redirects. Get your download sorted here: pokerbaazidownload.
Alright, listen up. vip777login treated me well. Solid interface and the customer service was quick to help. Give it a try: vip777login
Alright, so I hooked up my bet168wallet, and the transactions were smooth. Super easy topping up and withdrawing. Give it a spin if you’re keen: bet168wallet
Heard about 666betfreebet offering some free bet action, and I had to try it out. The promo was pretty sweet, easy to claim, and I actually managed to win a little something! Website design isn’t ground-breaking, but it works. See what freebies you can get over at 666betfreebet.
Alright peeps, 69vnvvip caught my attention. Checking it out now. See for yourself if you like 69vnvvip.