भोंडला हा लहान मुली, महिलांचा जसा आहे, तसाच तो सासुरवाशिणींचा आवडता खेळ आहे. यातून त्यांची अभिव्यक्ती प्रकट होते. सासर-माहेरबाबतची मते व्यक्त करता येतात. म्हणूनच यातून आपल्यावर होणाºया अन्यायाला वाचा फोडण्याची संधी नवविवाहितांना, सासुरवाशिणींना मिळत असे. टोमणे मारण्याचा प्रकार असतो, तशीच काही गाणी या भोंडला गीतांमधून व्यक्त होतात. त्यापैकी एक गाणे म्हणजे, ‘कारल्याचा वेल लाव गं सुने.’
सासरच्या अंगणात फेर धरून भोंडला करताना एक सासुरवाशिण आपल्या भावना या गीतातून व्यक्त करते. माहेरी जाणे यासारखा मुलींना आनंद नसतो. माहेरचे सगळे सुखात आहेत याची जाणिव झाली की, मुलगी सासरी सुखात राहते. त्यामुळे माहेरची ओढ कायमच असते, पण सुनेने माहेरी जायचे नाव काढले की, सासू लगेच फणफणते. नुकतीच तर जाऊन आलीस ना?, सारखे-सारखे काय माहेरी आहे? हे आजही आहेआणि तेव्हाही होते. फक्त त्या काळात विचारून जायची पद्धत होती. आजकाल सासर- माहेर एकाच गावात, शहरात असेल, तर माहेरी जाण्याचा ना सासरी जाण्याचा कसलाच आनंद मिळत नाही,
पण ही एक सून आपल्या सासूकडे मला माहेरी जायचे म्हणून परवानगी मागते आहे. त्यावर सासूकिती बहाणे करते आणि माहेरी जाणे लांबवते हे या गीतातून दिसून येते.
‘कारल्याचा वेल लाव गं सुने, लाव गं सुने,
मग जा अपुल्या माहेरा माहेरा.’ त्याला सुनबाई
उत्तर देते की, ‘कारल्याचा वेल लावला हो
सासूबाई, लावला हो सासूबाई, आता तरी जाऊ
का माहेरा माहेरा’, पण सासू चांगलीच हुशार
आहे. ती म्हणते, ‘कारल्याला कारली येऊ देत
गं सुने, येऊ देत गं सुने, मग जा अपुल्या माहेरा
माहेरा.’
वेल लावल्यानंतर वेलाला कारली यायला तीन-चार महिने तरी लागणार. तेवढा काळ ती सुनेला थांबवून ठेवते. या वेलाला कारली आल्यावर सून आनंदाने विचारते,
‘ कारल्याला कारली आली हो सासूबाई, आली हो सासूबाई, आता तरी जाऊ का माहेरा माहेरा’,
पण सासू ही चांगलीच खाष्ट आहे. जेवढे लांबवता येईल तेवढे लांबवायचे. चार महिनेथांबवले. आता अजून एक दिवस थांबवण्याचा
प्रयत्न ती करते, ती सासू सुनेला म्हणते,
‘कारल्याची भाजी कर गं सुने, कर गं सुने, मग जा अपुल्या माहेरा माहेरा.’
कारल्याची भाजी ही काही पटकन होणारी भाजी नसते. ती नटवायला लागते. तिचा कडूपणा लागू नये म्हणून फडक्यात फोडी काढून, मीठ, हळद लावून बांधून ठेवावी लागते. त्याचा चिंच गूळ मसाला तयार करावा लागतो. तिळाच्या दाण्याचे कूट करावे लागते. यात बायकांचा एक
दिवस मस्तपैकी जातो. म्हणून ती सासू भाजी करण्याचा आग्रह धरते.
आता हे सगळे सून करते आणि पुन्हा सासूला विचारते,
‘ कारल्याची भाजी केली हो सासूबाई, केली हो सासूबाई, आता तरी जाऊ का माहेरा माहेरा.’
मग काय सासुबार्इंचे प्रेमच उतू जाते. त्या आता तिला जेवणाचा आग्रह करतात.
‘कारल्याची भाजी खा गं सुने, खा गं सुने, मग जा अपुल्या माहेरा माहेरा.’
यातून ही सून एक दाखवते की, सासूच्या हातून गोड काही मिळणार नाही. तर खायला कडवट कारलीच मिळणार. मग त्याला उत्तर ती देते की,
‘कारल्याची भाजी खाल्ली हो सासूबाई, खाल्ली हो सासूबाई, आता तरी जाऊ का माहेरा माहेरा’,
तरी शेवटच्या क्षणापर्यंत तिला विलंब करायचा प्रयत्न सासू करते. म्हणजे आजकालच्या टीव्ही मालिकांमध्ये सासू-सुना एकमेकींवर कुरघोडी
करण्याचा प्रयत्न करत असतात, तसाच प्रकार येथेही दिसतो. म्हणूनच हा सासूचा कडवटपणा दाखवण्यासाठी सून हे गाणे म्हणते आणि भोंडल्यातून आपली बंडखोरी प्रकट करत व्यक्त होते. आता सासू म्हणते,
‘ आपलं उष्ट काढ गं सुने, काढ गं सुने, मग जा अपुल्या माहेरा माहेरा’
आता खरेतर सासुरवाशिण उष्टी खरकटी काढल्याशिवाय राहणार नाही, पण आपला एक धाक दाखवायचा आणि तिला कामाला सतत जुंपल्याची भावना मनात असली पाहिजे हे यातून दाखवलेजाते. सून म्हणते, ‘आपलं उष्टंकाढलं हो सासूबाई, काढलं हो सासूबाई, आता तरी जाऊ का माहेरा माहेरा’.
आता सासू तयार होते. ‘आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा’
‘आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा.’
सासरहून माहेरी जाताना तिला अगदी राणीसारखेआनंदात सजवून, दागदागिनेघालून पाठवले जाते.
सासरची श्रीमंती आणि आनंद दाखवण्यासाठी तूजायचे आहेस, येथे तुला काही कमी नाही हे आई-बापाला बिंबवायचे
आहे. यासाठी हा आटापिटा आहे हे यातून दाखवून दिले आहे. या एकूणच गीतामधून स्त्रियांचे जीवन पूर्वी कसे होते हे समोर येते. त्यातील त्यांना व्यक्त होण्यासाठी असलेली संधी हा भोंडला होता. म्हणून त्या या भोंडल्याचा फायदा बंडखोर गीतांसाठी केला जात होता.
प्रफुल्ल फडके/



What’s up everyone! Gave vuabetvn a shot last week. It had a few quirks, but overall a positive experience. Got some interesting options I haven’t seen anywhere else. Definitely check out vuabetvn.
OrionPlayCasino! It’s on my watchlist – I played a round last week & won a good sum of money. It took a little while for winnings to come through to my account, but the support team were really helpful! Take a look: orionplaycasino
Alright, hear me out, Xoso123… Been dabbling in some lotto stuff, and this site is surprisingly easy to use. Quick results, and the chances are decent. Worth a look if you enjoy that kind of thing: xoso123. Remember to gamble responsibly!
You haven’t checked out phdream333? Dude this game is amazing and you won’t regret playing. Do check out the link! phdream333
Spincassino, got the spins on my mind! Hope they have a good selection of slots. Let’s give it a whirl! spincassino