अरडी गं बाई परडी, अरडी गं बाई परडी।
परडी एवढं काय गं, परडी एवढं फूल गं।।
दारी मूल कोण गं, दारी मूल सासरा।
सासºयाने काय आणलंय गं, सासºयाने आणल्या
पाटल्या।।
पाटल्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही।
चारी दरवाजे लावा गं बाई, लावा गं बाई।।
झिपरं कुत्रं सोडा गं बाई, सोडा गं बाई।
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं।।
दारी मूल कोण गं, दारी मूल सासू।
सासूने काय आणलंय गं, सासूने आणल्या बांगड्या
बांगड्या मी घेत नाही, सांगा
मी येत नाही।।
चारी दरवाजे लावा गं बाई,
लावा गं बाई।
झिपरं कुत्रं सोडा गं बाई,
सोडा गं बाई।।
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं।
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं।।
दारी मूल दीर, दीराने काय आणलंय गं।
दीराने आणले तोडे
तोडे मी घेत नाही, सांगा मी येत नाही।।
चारी दरवाजे लावा गं बाई, लावा गं बाई।
झिपरं कुत्रं सोडा गं बाई, सोडा गं बाई।।
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं।
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं।।
दारी मूल जाऊ, जावेने काय आणलंय गं।
जावेने आणला हार
हार मी घेत नाही, सांगा मी येत नाही।।
चारी दरवाजे लावा गं बाई, लावा गं बाई।
झिपरं कुत्रं सोडा गं बाई, सोडा गं बाई।।
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं।
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं।।
दारी मूल नणंद, नणंदेने काय
आणलंय गं।
नणंदेने आणली नथ
नथ मी घेत नाही, सांगा मी येत
नाही।।
चारी दरवाजे लावा गं बाई, लावा गं बाई।
झिपरं कुत्रं सोडा गं बाई, सोडा गं बाई।।
अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं।
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं।।
दारी मूल नवरा, नवºयाने काय आणलंय गं।
नवºयाने आणले मंगळसूत्र
मंगळसूत्र मी घेते सांगा मी येते।।
चारी दरवाजे उघडा गं बाई, उघडा गं बाई।
झिपरं कुत्रं बांधा गं बाई, बांधा गं बाई।।
भोंडला गीतात घरच्या जाचाने कंटाळलेली आणि विटलेली ही आणखी एक सून आहे. या सगळ्या समवयस्क सुनांचा इतका कोंडमारा व्हायचा की, सहनशक्तीचा अंत झाल्यावर त्यांच्यातून बंड व्हायचं. ते बंड ती आपल्या गाण्यातून व्यक्त करायची. खूप जाच झालेली ही सून तिला घरातला हक्काचा जोडीदार हवा आहे. बाकी तिला कसल्याही दागदागिन्यांचा मोह नाही. त्यामुळेच ती जेव्हा रूसून माहेरी जाते, तेव्हा यादवराय राणीप्रमाणेच घरातले सगळे नातेवाईक इथेही तिला आमिष दाखवतात; पण ती नुसती येण्यास नकार देत नाही, तर आपला संताप व्यक्त करण्यासाठी सासरच्या माणसांना माझ्या माहेरच्या घरी येऊ पण देऊ नका. त्यांच्यावर कुत्रं सोडा, असेच आपल्या मैत्रिणीना सांगते. तसे मजेशीरच आहे हे गाणे; पण त्यातल्या भावना अत्यंत बंडखोर आहेत.
आपल्याला न्यायला कोणीतरी येणार. ते एखादं लहान मूल असेल. याचा अर्थ आपला नवरा असेल. लहान वयात लग्न व्हायची त्यामुळे तिचा तो सखा सवंगडी आहे; पण घरातल्या कामातून दोघांना एकत्र बागडायलाही मिळत नसेल. त्यामुळे तिला इथे त्याची साथ हवी आहे. बाकीचे रोखत आहेत. तिला सारखे वाटते कोणीतरी न्यायला येणार, म्हणून ती प्रत्येकवेळेस दारी मूल कोण विचारते. पण पहिल्यांदा येतो सासरा, मग येते सासू, मग येतो दीर,मग येते जाऊ, त्यानंतर येते नणंद. प्रत्येक जण तिला दागिन्यांचे आमिष दाखवतो. कुणी पाटल्या, कुणी बांगड्या, कोणी तोडे, कुणी चंद्रहार, कुणी नथ. पण कसल्याही आमिषाला बळी न पडता आपला हट्ट चालूच ठेवते आणि सगळ्यांना दरवाजे बंद करते.
शेवटी नवरा येतो आणि तिला मंगळसूत्र आणल्याचे सांगतो. या मंगळसूत्रात असलेल्या दोन वाट्या म्हणजे सासर आणि माहेर असते. त्यामुळे सासर आणि माहेराला एका धाग्यात, एका सूत्रात बांधण्याची कल्पना असलेले हे मंगलमय असे सूत्र नवरा आणतो, तेव्हा तिला तिचा हक्क मिळाल्याची जाणीव होते आणि ती सगळे दरवाजे उघडून स्वागतासाठी तयार होते. नवºयाच्या अंगावर जाऊ नये, म्हणून कुर्त्याला बांधून ठेवायला ती सांगते. अशाप्रकारे ती आपलं बंड यशस्वी करते.
प्रफुल्ल फडके/ जागर



Been playing on h2betcasino for a bit now. The live casino games are pretty good, especially if you like that real dealer experience. Not the flashiest casino out there, but reliable. Check them out here: h2betcasino
Umbet4 is a decent platform. Nothing groundbreaking, but it gets the job done. Quick deposits and withdrawals are a big plus. Just keep manage your bankroll wisely! umbet4
777phslot, slots are fun, and the graphics are pretty good. I’ve had a few wins, so I can’t complain. Spin those reels at 777phslot.
11aavip. VIP, huh? Gotta see if the VIP treatment is actually VIP or just a marketing gimmick. Hoping for personalized service! 11aavip
Hey folks, just checked out 99ok5 and it’s got a decent selection of games. Nothing groundbreaking, but good if you’re looking for something new to try. Check it out at 99ok5