भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, राजकारणातील एक अत्यंत सभ्य, अभ्यासू आणि कवीमनाचे नाही, तर कवीच असलेले नेते म्हणून वाजपेयी यांचे स्थान चिरंतन आहे. कोणीही त्यांचा राग करू शकत नाही इतके सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व म्हणजे वाजपेयी. कायम आशावादी राहणारी त्यांची स्वभावशैली हेच आजच्या भाजपचे यश आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारा विश्वास देणारे म्हणून वाजपेयींकडे पहावे लागेल, कारण ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ अशी आपल्याकडे म्हण आहे. कमल जरूर खिलेगा हे त्या कवीमनाच्या वाजपेयींनी ओळखले होते, त्यांना दिसले होते म्हणून आज हे लोक सत्तेत आहेत. म्हणूनच अटलजींच्या ताकदवान कवितांवर आज नजर मारावी लागेल.
आओ फिरसे दिया जलाएँ ही वाजपेयींची खूप गाजलेली कविता. जनसंघ, भाजप अडचणीत असताना त्यांनी दाखवलेला हा आशावाद फार महत्त्वाचा आहे. ती प्रेरणा आज गाळात गेलेल्या सर्व पक्षांना दीपस्तंभासारखी ठरेल. अगदी काँग्रेसला नवी उभारी घेण्यासाठीही या कविता मार्गदर्शक ठरतील. वाजपेयींनी आपल्या ‘मेरी एक्क्यावन कविता’ या पुस्तकात आलेली ही कविता आहे.
आओ फिर से दिया जलाएँ
भरी दुपहरी में अँधियारा
सूरज परछाई से हारा
अंतरतम का नेह निचोड़ें
बुझी हुई बाती सुलगाएँ
आओ फिर से दिया जलाएँ
एखादी हार झाली म्हणून सगळं संपलं आहे असे वाटायचे कारण नाही. जी ताकद कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ या कवितेतील ‘तू फक्त लढ म्हण’ या ओळीत आहे तीच ताकद वाजपेयींच्या या कवितेत आहे. १९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली आणि राजीव गांधी हंगामी पंतप्रधान झाले. त्यानंतर दोनच महिन्यांत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. भारतीय जनना पक्षाने लढवलेली ही पहिलीच निवडणूक होती, पण या निवडणुकीत भाजपची पार वाताहात झाली. फक्त दोन खासदार निवडून आले. भाजप संपला की काय? जनसंघ संपला की काय? १९७७ ला जनता पक्षात विलीन करून या पक्षाचा विचार संपला की काय, असे चित्र उभे राहिले. त्याचवेळी कमल जरूर खिलेगा असा विश्वास देऊ न वाजपेयींनी या कवितेतून जणू आओ फिरसे दिले जलाये, असा संदेश दिला. पुढच्या पाच वर्षांत २ वरून ८५ पर्यंत पोहोचले. पक्षाला त्यावेळी दिलेला हा विश्वास, हा आशावाद फार महत्त्वाचा होता. याकडे राजकीयदृष्टीने न पाहता आजच्या परिस्थितीतूनही पाहता येईल. आज नोकºया गेल्या, उत्पन्न कमी झाले, अनेकांच्या जीवनात अंध:कार माजला असताना वाजपेयींची ही कविता आपल्याला प्रेरणा देईल, असे समजायला हरकत नाही.
हम पड़ाव को समझे मंजिल
लक्ष्य हुआ आँखों से ओझल
वर्तमान के मोहजाल में
आने वाला कल न भुलाएँ
आओ फिर से दिया जलाएँ
आत्ता असलेले यश किंवा अपयश हे खरे नाही. ही एक आपली पायरी आहे. आपल्याला आणखी पुढे जायचेय. या पायरीवर अंधार आहे की उजेड, सुख आहे की दु:ख याचा विचार न करता आपल्याला पुढे जायचे आहे, हा विचार यातून फार महत्त्वाचा आहे. वर्तमानाच्या मोहजालात फसू नका, तर आपला येणारा काळ हा चांगला असेल. कालचे दिवस सोन्याचे नव्हते, तर येणारे दिवस सोन्याचे असतील या विश्वासाने आपल्याला काम करावे लागेल. देश कोरोनाच्या संकटामुळे मागे गेला आहे. आर्थिकदृष्ट्या खालावला आहे, पण ही परिस्थिती कायम राहील, असे समजण्याचे कारण नाही. आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे असेल तर येणारा उद्याचा काळ महत्त्वाचा असेल.
आहुति बाकी यज्ञ अधुरा
अपनों के विघ्नों ने घेरा
अंतिम जय का वज्र बनाने
नव दधीचि हड्डियाँ गलाएँ
आओ फिर से दिया जलाएँ
कोणाच्या तरी त्यागातून कोणाचा तरी विजय होत असतो. दधिचीने आपल्या अस्थी दिल्या म्हणून इंद्राचे वज्र तयार झाले. त्यामुळे संघटनेचे त्याग हे तत्त्व असले, तर कोणी दधिची होतो, कोणी इंद्र पण हा सार्वत्रिक विजय असतो. आपण आपली आहुती दिली, प्राणाहुती दिली तरच हा देश अजरामर होईल. हा देश चालवणे, राजशकट चालवणे हा एक यज्ञ आहे. त्यासाठी या यज्ञाला आहुती कमी पडणार नाहीत इतके संघटन मोठे असले पाहिजे. यज्ञ म्हणजे हातात घेतलेले कार्य. हे कार्य अपूर्ण राहिले तर माणसं असून उपयोग काय? हातात घेतलेले काम पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. हा कर्माचा सिद्धांत इथे वाजपेयी सांगून जातात.
प्रयत्न करणे हे प्रत्येकाच्या हातात असते. प्रयत्न करण्यापूर्वीच माणसं जर हे होईल का? जमेल का? असल्या शंका घेत राहिले तर काहीच होत नसते. एक पाऊ ल पुढे टाकायचे असते. हे पाऊ ल पुढे टाकण्यासाठी प्रेरणा देणारी ही कविता फार महत्त्वाची आहे. वाजपेयींनी आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ पाहिला. नेहरूंबरोबरचा काळ पाहिला. लालबहादूर शास्त्रींबरोबरचा काळ पाहिला, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधींबरोबरचा काळही पाहिला. आणीबाणी पाहिली, तुरुंगवास पाहिला, यश पाहिले, अपयश पाहिले. पराभव पाहिला, हाती आलेली सत्ता १३ दिवसांत सोडायची वेळही आली आणि कालावधी पूर्ण करण्याची संधीही मिळाली. हे सगळे चढउतार आले तरी त्यांची अवस्था समसमान होती. गीतेत जो स्थितप्रज्ञतेचा सिद्धांत सांगितला आहे तो यापेक्षा वेगळा नाही. यश अपयशातही ते समान दृष्टीनेच वागले. याचे कारण त्यांचा विचारच आओ फिरसे दिये जलाएँ हा होता. दिवसानंतर रात्र, सुखानंतर दु:ख हे काळाचे नियम आहेत. त्यामुळे सत्ता सर्वस्व नाही आणि सत्तेबाहेर असणे म्हणजे संपल्याचे लक्षण नाही हे ते जाणत होते. त्यामुळे ते खºया अर्थाने ऋषितुल्य असे कर्मयोगाचे जीवन जगले.
वाजपेयींचा विचार हा संघविचार, भाजपचा विचार म्हणून न पाहता एक तटस्थपणे पाहिला तर तो सर्वच राजकीय पक्षांना मार्गदर्शक ठरेल. ही मोठी व्यक्तिमत्त्वं कोणत्या पक्षाची नसतात, तर ती देशाची असतात. त्यांचा सन्मान सर्वांनी करायचा असतो. वाजपेयींचा खºया अर्थाने आदर भाजपच्या लोकांपेक्षा राजीव गांधींनी अधिक चांगल्या प्रकारे केला होता. त्यांच्या पडत्या काळात त्यांच्यावर परदेशात औषधोपचार करण्याची किमया राजीव गांधींनी केली होती. हे आजच्या द्वेषाचे राजकारण करणाºया नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. विरोधकांचा सन्मान, प्रतिस्पर्ध्यांचा आदर, मोठ्यांचा मान राखणे ही आपली संस्कृती आहे. सत्ताधारी आणि विरोधक या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. कधी छापा तर कधी काटा. कायम छापाच पडेल असे कधी शक्य नसते. त्याचप्रमाणे कायम एकच राज्यकर्ता असेल असेही नाही. म्हणूनच आशावाद सोडता कामा नये. आमचेही दिवस येतील याचा विचार करायला लावणारी ही कविता म्हणूनच महान आहे.



Trying to login to 8k8comlogin! Sana walang hassle. Easy login and smooth gameplay are all I ask for. Let’s get this bread! Go login now: 8k8comlogin
Thinking about going VIP with yy567gamevip. Wonder if the perks are worth it. Anyone have experience with it? Let me know! Check it out here: yy567gamevip
Ugh, dealing with tclotteryloginproblem AGAIN. Seriously, these login issues are a pain. Anyone else having the same problem? Hoping for a fix soon! See more here: tclotteryloginproblem
Trying to jump into the 91club lottery, but the login is throwing me for a loop. Is there a specific link or method I should be using? Any help appreciated! Try your luck at 91clublotterylogin.
Just tried out zz777br1, and gotta say, it’s pretty slick! The layout is clean, and I found some games I really dig. Definitely worth checking out, guys! Give it a go at zz777br1.