Saturday, January 31, 2026
spot_img

सत्तेचा चाबूक हाती हवा

भोंडल्यातील बंडखोर गीतांतील पुढचेगाणे आहे ते म्हणजे, ‘यादवराया राणी’ हे.
हे गाणे संपूर्ण अगोदर वाचून पाहा, वाचतनाच यातील सहज बंडखोरी समजून येते. रुसून माहेरी गेलेल्या सुनेला समजवण्यासाठी,
सासरी घेऊन जाण्यासाठी सासरचे सगळेजण येतात. सासू येते, सासरा येतो, दीर येतो, जाऊ येते, नणंद येते. प्रत्येकजण काही ना काही आमिष
तिला दाखवतो, पण कसल्याही आमिषाला बळी न पडता आपल्या हक्कासाठी सून रुसून घरीच बसते.
आपले बंड चालूच ठेवते. शेवटी नवरा येतो आणि तिच्या मागण्या मान्य करतो. यातून तिचे हे बंड कसे यशस्वी होते हे या गाण्यातून दिसते.
यादवराया राणी घरास येईना कैसी।
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी।। धृ।।
सासूबाई गेल्या समजावयाला।
चल चल सूनबाई अपुल्या घराला।
अर्धा संसार देते तुजला।
मी नाही यायची अपुल्या घराला।
यादवराया राणी घरास येईना कैसी।
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी।।१।।
सासरे गेले समजावयाला।
चल चल सूनबाई अपुल्या घराला।
तिजोरीची चावी देतो तुजला।
मी नाही यायची अपुल्या घराला।
यादवराया राणी घरास येईना कैसी।
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी।।२।।
दीर गेले समजावयाला।
चला चला वहिनी अपुल्या घराला।
नवीन कपाट देतो तुम्हाला।
मी नाही यायची अपुल्या घराला।
यादवराया राणी घरास येईना कैसी।
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी।।३।
जाऊ गेली समजावयाला।
चला चला जाऊबाई अपुल्या घराला।
जरीची साडी देते तुम्हाला।
मी नाही यायची अपुल्या घराला।
यादवराया राणी घरास येईना कैसी।
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी।।४।
नणंद गेली समजावयाला।
चल चल वहिनी अपुल्या घराला।
चांदीचा मेखला देते तुजला।
मी नाही यायची अपुल्या घराला।
यादवराया राणी घरास येईना कैसी।
सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी।।५।।
पती गेला समजावयाला।
चल चल राणी अपुल्या घराला।
लाल चाबूक देतो तुजला।
मी येते अपुल्या घराला।
यादवराया राणी घरास आली कैसी।
सासूरवाशीण सून घरास आली कैसी।।६।।
भोंडल्यातून मुली हे गाणे म्हणतात,
कारण त्या सासूरवाशिणीला सासरी खूप त्रास झालेला आहे. छळ झालेला आहे. मानसिक कोंडी झालेली आहे. आपला कसलाच घरात अधिकार नाही याची जाणिव झालेली आहे. म्हणून आपल्या हक्कासाठी ती बंड करून रूसून बसली आहे. तिचा हा रुसवा इतका आक्रमक आणि बंडखोर आहे की, सगळ्यांना तिच्यापुढे नमते घ्यावे लागते.
पहिल्यांदा सासू येते आणि तुला अर्धासंसार देते, पण घरी चल म्हणते. पण तिला घराची वाटणी नको आहे, ती सासूला परत पाठवते. त्यानंतर
सासरा येतो आणि घरातल्या तिजोरीच्या चाव्या तुझ्या हातात देतो, पण घरी चल म्हणतो. तरी ती ऐकत नाही, सासºयाला परत पाठवते. मग मोठा
दीर येतो आणि तिला समजावतो आहे की, तू घरी चल तुला नवीन कपाट घेऊन देतो, त्यात सगळे तुझे सुख भरून ठेव. पण कपाटात कोंडून
ठेवणारे तिला सुख नकोच हवे आहे. ती दीरालाही परत पाठवते. मग मोठी जाऊ येते आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करते. ती तिला म्हणते, चला जाऊबाई तुम्हाला मी छान जरीची साडी घेऊन देते, पण या जरीच्या साडीलाही ती भुलत नाही. शेवटी नणंद येते आणि आपल्या वहिनीची समजूत काढू पाहते. ती म्हणते, चल वहिनी तुला मी चांदीचा मेखला देते, पण हा मेखलाही ती नाकारते आणि आपले बंड सुरूच ठेवते.
शेवटी नवरा येतो आणि तिला म्हणतो चल तुला छानपैकी लाल रंगाचा चाबूक घेऊन देतो, तू घरी चल. आता ती तयार होते. चाबूक हे सत्तेचे प्रतिक आहे. ज्याच्या हातात चाबूक तोच रथ, टांगा, घोडागाडी चालवू शकतो. हा संसाराचा गाडा चालवण्याचा चाबूक म्हणजे संपूर्ण सत्ता नवरा तिला देण्याचे मान्य करतो, तेव्हा ती घरी परत येते. त्यामुळे हे यशस्वी बंड आहे. यात लाल चाबूक आहे. लाल हे समानतेचे डाव्या विचारसरणीचे प्रतिक आहे. सर्वांना समान देणारे तत्त्व आहे. असा समानतेचा चाबूक तुझ्या हातात दिला तर तू सर्वांना समान न्याय देऊन
चांगली सत्ता गाजवशील, चांगले राज्य करशील, असा विश्वास नवरा देतो. सासू, सासरा, दीर, जाऊ, नणंद हे सर्वभांडवलदरांचे प्रतिक आहेत.
भांडवलदारांच्या सत्तेत सर्वसामान्यांचे शोषण होत असेल तर त्यांना असे बंड करावे लागेल हे सांगणारे हे भोंडला गीत आहे.
प्रफुल्ल फडके/ जागर संस्कृतीचा

आणखी वाचा

5 COMMENTS

  1. Alright, alright, phil168vip… I see you. Seems like a decent VIP option. Gonna need to dive a little deeper to see what’s what, but it’s got my attention. Anyone else tried it out? Let me know what you think! phil168vip

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Editor Prafulla Phadke -spot_img

चालू घडामोडी