पंढरीची वारी करणारा वारकरी हा देवाचीये द्वारी पोहोचत असतो. पंढरीची वारी म्हणजे आळंदी ते पंढरपूर हा मार्ग साक्षात जिवंतपणी वैकुंठाचे दर्शन घडवणारा प्रवास आहे. दशकानुदशके हा प्रवास सुरू आहे. अनेक दशके, शतके ही पंढरीची वारी दरवर्षी निघत आहे. पण या वारीला गेल्यावर कोणाला वाईट अनुभव आला आहे असे होत नाही. कारण हा सन्मार्ग आहे. ही वारी म्हणजे सन्मार्गाला लावणारा संप्रदाय आहे. लाखोंची संख्या असूनही इथे कधी ढकलाढकली होत नाही, चेंगराचेंगरी होत नाही, कारण विठोबा सगळ्यांच्या जवळ असतो. त्यामुळे ढकलत जाऊन, घुसाघुसी करून दर्शन घेण्याची इच्छाच कोणाला होत नाही. वारीचा मार्ग हा पुणे शहरातून जातो, सासवडच्या घाटातून जातो, मुळा, मुठा, कºहा, नीरा, कृष्णा अशा नद्यांच्या प्रदेशातून जातो, पण चंद्रभागेच्या तीरी या नद्यांचे तीर्थ जाते ते जनसागराला मिळते. भक्तिसागरात विलीन होते. तसा हा उलटाच प्रवास म्हणावा लागेल. म्हणजे प्रत्येक नदी ही उगमातून वाहते ती समुद्राला जावून मिळते. परंतु इंद्रायणी, मुळा, मुठा, कºहा, नीरा, कृष्णा या नद्यांचे पाणी मात्र या वारीच्या मार्गाने भक्तिसागरात मिळते.
हा प्रवास केल्यावर चंद्रभागेतील स्नान म्हणजे साक्षात सर्व नद्यांचे मिश्रण असलेल्या समुद्रस्नानाचा आनंद असतो. या चंद्रभागेत स्नान केल्यानंतर विठोबाचे दर्शन घ्यायचे म्हणजे आयुष्याचे सार्थक होत असते. पण लाखो वारकरी इथे कसे जमत असतात? त्याचे नियोजन कसे होत असते? एखादा शे दीडशे लोकांचा मोर्चा काढायचा म्हटले, तरी तेवढाच पोलीस बंदोबस्त आपल्याला लागतो. पण लाखोंच्या या गर्दीत पोलिसांना पाचारण करण्याची वेळ कधी येत नाही. मग हे नियोजन नेमके होते कसे? कोणत्याही व्यावसायिक प्रशिक्षण महाविद्यालयात न जाता माऊलीवर विश्वास ठेवून हे नियोजन होत असते. साक्षात माऊली आपल्याबरोबर आहे, ज्ञानोबा माऊली आपल्याबरोबर आहे हा विश्वास इथे असतो. त्यामुळे नियोजन हे व्यवस्थित होते.
आळंदीतून जेव्हा ज्ञानोबांची पालखी या वारीसाठी निघते, तेव्हा जो नामघोष होत असतो त्याने आपली सर्व ज्ञानेंद्रिये तृप्त होत असतात. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम’चा गजर आपल्या कानांना तृप्त करतो. श्रवणेंद्रियांना तृप्त केल्यामुळे याची देही याची डोळा हा सोहळा पाहणाºयाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत असतात. या आनंदात पावित्र्य निर्माण करणारा फुले, बुक्का, कापूर यांचा वास आपले ईश्वरी अधिष्ठान स्थिर करतो. कानांवर पडणाºया ग्यानबा तुकारामच्या जयघोषात आपला श्वास आणि रसना म्हणजे जीभ केव्हा सामील होते आणि त्या घोषात आपली जीभही नामस्मरण आणि जयघोष करते तेव्ही ती जीभही तृप्त होते. या सर्व ज्ञानेंद्रियांना तृप्त करताना नकळत जोडले जाणारे हात हे आपले सर्वात मोठे ज्ञानेंद्रिय म्हणजे स्पर्शज्ञान देणाºया त्वचेला आनंदी करते. त्याचा सगळीकडे प्रभाव होऊन आपल्या कांतीवर एकप्रकारचे तेज झळकते. ही ब्रह्मानंदी टाळी लागलेली असतानाच आता चला जाऊ पंढरीला म्हणत ज्ञानोबांची पालखी बाहेर येते. त्याला निरोप देताना साक्षात कळसच हालून होकार देतो आणि डुलायला लागतो की काय असा भास प्रत्येक भाविकाला होतो. हा अनुपम असा आनंद असतो. मग अंगात वारे संचारल्याप्रमाणे तल्लीन होऊन वारकरी पंढरीकडे निघतात. एकच ध्येय, चला जाऊ पंढरीला.
या पंढरीला जाण्यासाठी आणि वारकºयांच्या निवास, भोजनाची व्यवस्था करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत असतात. अनेक मठ काम करत असतात. त्याचप्रमाणे या वारकºयांच्या सेवेसाठी म्हणून अनेकजण पुढाकार घेत असतात. त्यामध्ये संत गाडगे महाराज संप्रदायाचे मठ, वारकºयांच्या संस्था आणि संघटना कार्यरत असतात. यात अखिल भारतीय वारकरी मंडळ, कर्नाटक वारकरी संस्था, कुंभमेळा वारकरी आखाडा परिषद, जागतिक वारकरी शिखर परिषद, तुकाराम महाराज पालखी सोहळा (संस्था), दिंडी, वारकरी, फडकरी संघटना, देहू गाथा मंदिर (संस्था), फडकरी-दिंडीकरी संघ, राष्ट्रीय वारकरी सेना, वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा-दिंडी समाज, ज्ञानेश्वर महाराज संस्थान, वारकरी प्रबोधन महासमिती यांच्यासह अनेक संस्था मोठ्या उत्साहाने काम करत असतात.
या वारीमध्ये कोणताही सरकारी हस्तक्षेप नको असतो. परंतु तरीही पुणे, सातारा, सोलापूरचे प्रशासन मोठ्या उत्साहात मदतीसाठी आणि वारकºयांच्या सेवेसाठी तयार असतात. अशी ही एकजूट फक्त वारीतच पाहायला मिळते. वारीमध्ये असतो फक्त भोळा भाव. निर्व्यास श्रद्धा. वारीच्या मार्गावर चालताना आपल्यातला अहंकार आपण पायदळी तुडवत जातो आणि पंढरपूरला जाईपर्यंत तो पार गाडला जातो. मग समोरचा तो मोठा आपण छोटे असे म्हणता म्हणता आपण मोठे होतो. ‘देव शोधावया गेलो, देव होऊनी आलो ’असे तुकोबारायांनी म्हटले आहे, तसे प्रत्येक वारकºयाबाबत घडत जाते. कारण या वारीत माणसाचा फक्त अहंकारच गळत नाही, तर भेदाभेदाच्या भिंती गळून पडतात. षडरिपूंचा नाश होतो आणि फक्त परमेश्वराचे चिंतनच महत्त्वाचे हे ज्ञान मिळत जाते. ते ज्ञान देण्यासाठी अनेक मोठे वारकरी विविध भक्तीमार्गांतून प्रबोधन करत असतात. त्यामध्ये कीर्तन आणि भारूड याला फार महत्त्व आहे.
– प्रफुल्ल फडके/पाऊले चालती/ २
९१५२४४८०५५



Sprunki Incredibox is a brilliant twist on the original, offering fresh beats and visuals that keep the creative juices flowing. For those who love musical experimentation, it’s a must-try. Check out more fun content at Shooting Games.
Keno’s all about probability, but managing your numbers is key! Seeing platforms like big bunny slot download offer easy peso transactions & quick deposits via GCash is a smart move for accessibility. Makes game time smoother!
YY88bet, yeah I know that place. Got some decent promotions and the odds aren’t too shabby. Give it a try if you’re looking for something new. Check it out here: yy88bet.
BingoPlusBrazil caught my eye! Not usually a bingo dude, but gotta try everything once, right? Maybe I’ll get lucky! Who wants to play? Play here: bingoplusbrazil
Hey everyone! Just checked out alo789topvn. Seems pretty legit, decent selection. Might be worth a look if you’re hunting for something new. Check it out for yourselves alo789topvn!
8qbets… The name is short and catchy! A nice selection of different betting options. Have fun with 8qbets
Heard some buzz about 30wim. Gonna toss some bets around & see what it’s all about. Maybe it’ll be my new favorite spot! Dive in: 30wim
Yo, so I checked out 789clubios recently. The games are decent, and the signup process was smooth. Nothing crazy mind-blowing, but a solid choice if you’re looking for something new. Check it out here: 789clubios