जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील आनंदी वातावरणात अचानक झालेल्या शोकाकूल वातावरणाने प्रत्येक भारतीयाचे मन भरून आले आहे. २८ पर्यटकांच्या हत्येची घटना खूप दु:खद आहे, पण काही लोक या हल्ल्याचा योग्य निषेध करू शकत नाहीत हे पाहूनही दु:ख होते. विशेषत: उबाठा, काँग्रेसचे नेते दहशतवाद्यांचा निषेध करायच्या ऐवजी सरकारचा निषेध करतात, तेव्हा खूप वाईट वाटते. हे लोक भारतीय म्हणायच्या लायकीचे आहेत का, असा प्रश्न यामुळे पडतो.
ज्या घटनेत लोकांचा धर्म विचारल्यानंतर त्यांना मारण्यात आले, त्याला दहशतवादी घटना म्हटले जात आहे, तर पर्यटकांना त्यांचा धर्म विचारल्यानंतर गोळ्या घालण्यात आल्याने ते थेट जिहादचे प्रकरण असल्याचे दिसते. इतकेच नाही तर, संयुक्त राष्ट्रांकडे पाहा जे प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहेत, त्याचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पहलगामच्या घटनेला सशस्त्र हल्ला असे संबोधून तीव्र निषेध केला आहे. प्रश्न असा आहे की, संयुक्त राष्ट्रांना सशस्त्र हल्ला आणि दहशतवादी किंवा जिहादी हल्ल्यात काय फरक आहे हे माहीत नाही का?
याशिवाय, काश्मीरवर प्रचार करणारे आंतरराष्ट्रीय माध्यम २६ भारतीयांच्या मृत्यूवर आपला खेळ सुरू ठेवत आहे. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल, तर बीबीसीची बातमी पाहा, ज्याचा मथळा आहे- भारत-प्रशासित काश्मीरमध्ये बंदूकधाºयांनी २६ पर्यटकांना ठार मारल्यानंतर धक्का आणि संताप, बीबीसीला बंदूकधारी आणि दहशतवादी किंवा जिहादी यांच्यातील फरक माहीत नाही का? अल जझीराची बातमी पाहा, त्याचा मथळा आहे- काश्मीर हल्ला लाईव्ह : पहलगाममध्ये २६ जणांच्या मृत्यूनंतर भारत बंदूकधाºयांचा शोध घेत आहे, प्रश्न असा पडतो की, या माध्यम संस्थांना बंदूकधारी किंवा दहशतवादी किंवा जिहादी यांच्यातील फरक स्पष्ट करण्याची गरज आहे का?
याशिवाय, दहशतवादाला धर्म नसतो असे म्हणणाºयांना हे देखील विचारले पाहिजे की, दहशतवाद्यांची नावे एका विशिष्ट धर्माशी का संबंधित आहेत? दहशतवादाला धर्म नसतो असे म्हणणाºयांना विचारले पाहिजे की, पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर का मारले गेले? त्यांना कलमा का म्हणण्यास सांगितले गेले आणि जेव्हा ते कलमा का म्हणू शकत नव्हते, तेव्हा त्यांना गोळ्या का मारल्या गेल्या? प्रश्न असा उद्भवतो की, एका पर्यटकाची सुंता झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याची पँट का काढली गेली? सुंता न झालेली आढळल्यावर त्याला गोळ्या घालून का मारण्यात आले? केवढे हे क्रौर्य म्हणायचे?
जर आपण पाहिले तर दहशतवादाचा धर्म असू शकतो किंवा नसू शकतो, परंतु आपल्या आजूबाजूला घडणाºया घटनांकडे पाहिले तर हे स्पष्ट होते की, दहशतवादाचा सर्वात जास्त परिणाम हिंदू धर्मावर होतो. भारतात बहुसंख्य असूनही, हिंदूंना गोळ्या घालून मारले जाते? त्यांना त्यांच्या घरातून स्थलांतर करण्यास भाग पाडले जाते. पाकिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंना विसरून जा, तिथे त्यांचे अस्तित्वच धोक्यात आहे.
अर्थात, एनआयएने पहलगाम प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. परंतु या संपूर्ण घटनेमागील उद्देश समजून घेणे आणि योग्य कारवाई करणे महत्त्वाचे आहे. आपल्या एजन्सींनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारे लोकांना मारले आहे. आपल्या एजन्सींनी, पीडित कुटुंबांनी सांगितले आहे की, दहशतवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देणारे आहेत म्हणून त्यांना मारले आहे. जर काळजीपूर्वक पाहिले तर हे भारताच्या निवडून आलेल्या सरकारला थेट आव्हान असल्याचे दिसून येते. मोदी सरकारने तिथले छान पुनर्वसन केल्याने दहशतवादी बेरोजगार झाले आणि लोक सुरक्षित झाले. इथला पर्यटनाचा उद्योग बहरू लागला त्याचे दु:ख दहशतवाद्यांना झाले. त्यामुळे हा हल्ला केला गेला. पण याचे वृत्तांकन करताना वाहिन्यांनी दिलेला रंग आणि त्यावर टीका करताना सरकारला दोषी धरण्याचा काँग्रेसचा पवित्रा हा देशासाठी धोकादायक असा आहे.
गुरुवारी अनेक ठिकाणी बंद पाळ्ण्यात आला. अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पण काँग्रेस आणि उबाठाने दहशतवाद्यांचा निषेध न करता सरकारचा निषेध केला हे पाहून संताप आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही दहशतवाद्यांचे समर्थक आहात का असा प्रश्न त्यांना विचारावासा वाटतो. यशोमती ठाकूर म्हणतात बिहार निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने याचे राजकारण केले आहे. शरम वाटली पाहिजे या बार्इंना असे बोलताना. त्यांना विचारले पाहिजे की २६/११चा मुंबईवरील हल्ला २००९च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसने घडवला होता का? किती पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचे समर्थन करणार आहे काँग्रेस? विजय वडेट्टीवारही असेच काहीसे बरळत होते. यांना जराही देशाबाबत प्रेम नाही का? हा हल्ला झाल्याचा आनंद या लोकांच्या चेहºयावर दिसतो आहे असे म्हणावे लागेल. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा निषेध करायला यांची जीभ रेटत नाही आणि सरकारचा निषेध करतात, यावरून यांची प्रवृत्ती दिसून येते. आपण जसे वागतो तसे जग दिसते, जसा चष्मा लावू तसे दिसते. काँग्रेसने कायम अशा घटनांचे राजकारण केले म्हणून त्यांच्या डोक्यात हे आहे. पण यामुळे जनतेच्या मनातून काँग्रेस पार नामशेष होताना दिसेल यात शंका नाही. आम्हाला पाकधार्जिणे पक्ष या देशात नकोत असा विचार जनता करत आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या ओंजळीने पाणी पिणाºया उबाठानेही विचार करून बोलले पाहिजे आणि स्वत:चा मेंदू वापरला पाहिजे.



Been playing on zzwinvip for a bit now. It’s alright, nothing crazy, but it gets the job done. Decent interface and okay odds. Worth a look if you’re bored: zzwinvip
Goperya caught my eye with its promise of something different. and I was not disappointed! Its fun, fair, and full of possibilities. goperya.
Yo, gamerikvipart! Heard some chatter about this place. Seems like a decent spot for online gaming. Anyone tried it and got some feedback? Thinking of giving it a go myself. Find out more: gamerikvipart
Juegos1001 feels like a throwback to classic gaming. Plenty of simple, addictive games which is great for a quick distraction. Worth at least a browse. Link here to juegos1001.
Guys, you know I love to keep it real so, I’m going to say betanocassino is legit. Their site is easy to navigate and I didn’t have any glitches so, I will say I’m happy with everything. betanocassino is a good shout!